कणकवलीत हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीने शनिवार दिनांक २ एप्रिल २०२२ ला गुढीपाडव्याच्या दिवशी “हिंदु नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन केले आहे.
या यात्रेत रथारूढ भारतमाता, वारकरी दिंडी, छत्रपती शिवाजी महाराज, सजवलेल्या बैलगाडया, ढोलपथक, ध्वजपथक, लेझीम पथक, वेग वेगळी रूपे धारण केलेली लहान मुले-मुली, वेगवेगळे ऐतिहासिक वेशभूषा परिधान केलेले कलाकार, तसेच सर्व नागरिक आपल्या पारंपारिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत.
या यात्रेत हिंदू धर्म व संस्कृती यांचा संगम पाहता येणार आहे. तसेच यात्रेत सर्वजण जात-पात, पंथ-संप्रदाय, प्रांतवाद, भाषावाद व पक्ष हे सर्व बाजूला ठेवून सकल हिंदु समाजाचा एक घटक म्हणून सहभागी होणार आहेत.
सर्वांनी आपल्या परिवारासह यात्रेत सहभागी व्हावे तसेच आपण आपला मित्र परिवार यांनाही या यात्रेत सहभागी होण्यास आग्रहपूर्वक विनंती करावी व आपल्या श्रेष्ठ रूढी व परंपरां ज्यांना विज्ञानाचा आधार आहे त्या पुढच्या तरुण पीढीला माहिती व्हाव्यात, त्यांनी त्यांची जोपासना करावी या हेतूने हे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेचा समारोप प्रसिद्ध वक्ते मा.डॉ. संतोष निंबाळकर हे आपली पुरातन हिंदु
संस्कृती, तिचे महत्व आणि जपणूक या विषयाने करणार आहेत.
यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरु होऊन पटवर्धन चौक-बाजार पेठ जलकाठी मार्ग कणकवली कॉलेज समोरील शिवारा मंदिर येथे समारोप होईल असे आयोजकांकडून स्पष्ट केले गेले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)