ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा २ एप्रिल रोजी.

राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा २ एप्रिल रोजी.

प्रकाशन: 01 Apr 2022 02:55 PM
वाचन संख्या 32

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिक जिल्ह्यांसह उर्वरित महाराष्ट्रातील घाडीगावकर समाजातील लग्नाळू “वधू-वरांचा व पालकांचा राज्यस्तरीय परिचय मेळावा” गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर २ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता प्राध्यापक सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, मुंबई अग्निशमन दला शेजारी, दादर पूर्व, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्या बाबत पुणे-नाशिक कराड कोल्हापूर या विभागातील घाडीगावकर बांधवानाही कळविण्यात आले आहे. या मेळाव्याची नोंदणी करण्यास सुरुवात झाली असून याबाबत सविस्तर माहिती आवश्यक असल्यास घाडीगावकर समाजाचे वधू-वर समिती प्रमुख रघुवीर वायंगणकर (नारिंग्रे) यांचेशी मोबाईल क्रमांक 8830666579 वर संपर्क साधावा अशी विनंती करण्यात आली आहे.

या मेळाव्याची माहिती समाज बांधवांनी आपल्या इतर समाज बांधवांना सुद्धा फोन द्वारे अथवा संपर्काद्वारे कळवावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स