ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मांडावरील 'हास्यकल्लोळ' स्पर्धेत कलांकुर ग्रुप,मालवण प्रथम…!

मांडावरील 'हास्यकल्लोळ' स्पर्धेत कलांकुर ग्रुप,मालवण प्रथम…!

प्रकाशन: 01 Apr 2022 01:40 PM
वाचन संख्या 81

कै.सुरेश अनंत धडाम स्मृति महापुरुष मित्रमंडळ बाजारपेठचे आयोजित !

कणकवली | प्रतिनिधी –कै.सुरेश अनंत धडाम स्मृति महापुरुष मित्रमंडळ बाजारपेठ आयोजित झेंडा चौकातील मांडावर महापुरुष मित्रमंडळाने आयोजित केलेल्या हास्यकल्लोळ स्पर्धेत कलांकुर ग्रुप, मालवण संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. अस्सल मालवणी,अस्सल मालवणी क्रिएशन,कणकवली संघाने व्दितीय ,कार्टी कणकवलीची या संघाने तृतीय क्रमांक पटकविला.तर उत्तेजनार्थ सिंधुरत्न, मालवण यांना मिळाला.या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांनी
विविध विषयावर भाष्य करीत रसिकांचे मनोरंजन व समाजप्रबोधनही केले.

या हास्यकल्लोळ स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला होता. या संघांनी विविध विषयांवर सोंगे सादर करून रसिक प्रेक्षकांना खखळून हसवले.तर माडयाचीवाडी कुडाळ संघाने विविध अंगानी वेशभूषा साकारून मनोरंजन करत स्पर्धेत रंगत आणली.त्यानंतर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.यावेळी ज्येष्ठ नागरिक शरद पारकर, बाळा सापळे, दिलीप पारकर,नाथा अंधारी, चंदू सावंत,अनिल मुंज,महापुरुष मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी, उपाध्यक्ष राजू पारकर, खजिनदार मंदार सापळे, उद्योजक नीलेश धडाम, राजेश सापळे, विलास कोरगावकर, राजू मानकर,उदय मुंज, दिनेश नार्वेकर, हर्षल अंधारी,हरीश उचले,विकास काणेकर,प्रद्युम मुंज, सोहम वाळके, प्रज्वल वर्दम, चेतन अंधारी,दत्ता तोरस्कर,यश अंधारी, वृषभ मेंनकुदळे, वृद्र सापळे, संदीप अंधारी, आकाश बिडये, आदी उपस्थित होते. या स्पर्धेतील विजेत्या कलांकुर ग्रुप मालवण संघाला १० हजार रु. व चषक व सन्मानपत्र, द्वितीय क्रमांक अस्सल मालवणी क्रिएशन संघ ८००० हजार रु.चषक व प्रशस्तीपत्रक तसेच तृतीय ६००० हजार रु.चषक व प्रशस्तीपत्रक
देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.या स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रा.हरिभाऊ भिसे,सुहास वरुणकर,अभय खडपकर यांनी काम पहिले.त्याचा मंडळाच्या वतीने सनामचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.तर सूत्रसंचालन व आभार बाळू वालावलकर यांनी मानले.आज रात्रौ ९ वा. प्रा.हरिभाऊ भिसे,विलास खानोलकर,श्रीरंग पाचंगे यांच्यासह ३० कलाकाराच्या संचात रंगखांब प्रस्तुत,’मांडावरील जल्लोष’ हा कॉमेडी कार्यक्रम सादर होणार असून रसिकांनी पहावा असे आवाहन महापुरुष मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Article image
Article image
Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स