तळाशिल येथील सुमंत आडकर यांचे निधन.
तारकर्ली | सुरेश बापार्डेकर : मालवण तालुक्यातल्या तळाशील गावातील समाजसेवक श्री. सुमंत शत्रुघ्न आडकर ( वय ७०) यांचे निधन झाले.
बुधवार दिनांक ३० मार्च २०२२ला सकाळी आकस्मित त्यांचे निधन झाले. त्यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये सेवा बजावली होती.
त्यांच्या पश्चात पाच भाऊ आणि दोन बहिणी ,दोन मुली आणि मुलगा ,नातवंडे असा मोठा परिवार आहे. ईशान्य मुंबई भाजपच्या कोकण विकास आघाडीचे श्री.राजेश आडकर यांचे ते वडिल होत.त्यांच्या निधनाने तळाशील गावातून शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)