ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
महापुरुष मित्रमंडळाच्या 'हास्यकल्लोळ' स्पर्धेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

महापुरुष मित्रमंडळाच्या 'हास्यकल्लोळ' स्पर्धेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

प्रकाशन: 30 Mar 2022 07:33 PM
वाचन संख्या 55

उद्या सादर होणार रंगखांब प्रस्तुत मांडावरील जल्लोष कॉमेडी कार्यक्रम…!

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : कणकवलीत कै.सुरेश अनंत धडाम स्मृती महापुरुष मित्रमंडळ बाजारपेठ आयोजित झेंडा चौकातील मांडावर हास्यकल्लोळ स्पर्धा आयोजित केली आहे.या स्पर्धेचा शुभारंभ जेष्ठ नागरिक दत्ता सापळे यांच्याहस्ते करण्यात आला.

कणकवली असल्ल मालवणी क्रिएशन संघाने ‘ बाबलो झालो आमदार ‘ या थिमवर कॉमेडी स्किट सादर करून राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.झिरो बजेट प्रोडक्शन या संघाने ‘ गोंधळ ‘ या थिमीवर सामाजिक गोंधळावर प्रकाश टाकत समाजप्रबोधन करत रसिकांची मने जिंकली.या ‘हास्यकल्लोळ’ स्पर्धेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी काशीविश्वेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रविण पारकर,जेष्ठ नागरिक शरद पारकर,बाळा सापळे,दिलीप पारकर,विजय पारकर,नाथा अंधारी,चंदू सापळे,अनिल मुंज,मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी,उपाध्यक्ष राजू पारकर,खजिनदार मंदार सापळे,उद्योजक निलेश धडाम, राजेश सापळे,विलास कोरगांवकर,राजू मानकर,उदय मुंज,आबा उचले,दिनेश नार्वेकर,हर्षल अंधारी,विकास काणेकर,प्रद्युम मुंज,सोहम वाळके,प्रज्वल वर्दम,चेतन अंधारी,यश अंधारी,वृषभ मेंनकुदळे,वृद्र सापळे,संदीप अंधारी,आकाश बिडये,आदी उपस्थित होते.या स्पर्धेत १४ संघानी सहभाग घेतला असून या स्पर्धेतील असल्ल मालवणी क्रिएशन संघाने ‘ बाबलो झालो आमदार या थिमीवर स्किट सादर करीत राजकीय परिस्थितीवर भाष्य करीत रसिकांनी खखळून हसवले.

या कॉमेडी स्किटमधून बाबलो नावाचे पात्र हे व्यसनाच्या आहारी गेलेले असते. आमदार होण्याच्या उद्देशाने हे पात्र व्यसन सोडून राजकीय क्षेत्रात उतरते आणि निवडणूक लढवत निवडून येतो.आमदार झाल्यानंतर कोणकोणत्या प्रश्नाला सामोरे जावे,याची वस्तुस्थिती कॉमेडी स्वरूपात सादर केली .या कॉमेडी प्रसंगाला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

या स्पर्धेला कणकवलीतून आणि बाहेरुनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

झिरो बजेट प्रोडक्शन या संघाने ‘ गोंधळ ‘ या थिमीवर सादरीकरण करत सामाजिक गोंधळावर प्रकाश टाकला . सिद्धभराडी ,ओसरगाव व महापुरुष मित्रमंडळ,सोनवडे संघांनी पारंपरिक सोंगे सादर करून रसिकांची मने जिंकली या स्पर्धेचे परीक्षण सुहास वरुणकर,प्रा.हरिभाऊ भिसे,अभय खडपकर यांनी केले.तर सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले.

आज रात्रौ ९वा.हास्यकल्लोळ स्पर्धेचा दुसरा दिवस असून ७ संघाचे सादरीकरण होणार असून विजेत्या संघास मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

उद्या ३१ मार्च रोजी रात्रौ ९ वा.रंगखांब प्रस्तुत,’मांडावरील जल्लोष’ हा ३० कलाकाराच्या संचातील कॉमेडी कार्यक्रम सादर होणार असून रसिकप्रेक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महापुरुष ,मित्रमंडळ,बाजारपेठच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स