कसवण तळवडेतील कट्टर राणे समर्थकांची भाजपला सोडचिठ्ठी ..!
शिवसेना नेते सतीश सावंत,संदेश पारकर यांच्या उपस्थितीत शिवबंधनात..!
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : कणकवली तालुक्यातील कसवण तळवडे या गावचे कट्टर आणि समर्थक तथा भाजप कार्यकर्ते माजी उपसरपंच मनोहर मालंडकर, उदय सावंत, गणपत मेस्त्री, जगन्नाथ राणे, प्रकाश मेस्त्री, अरुण सरपे, भिकाजी सापळे, सिताराम गुरव, भिकाजी गुरव, सुदेश मेस्त्री, सत्यवान मेस्त्री, चंद्रकांत सावंत यांनी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या उपस्थितीत कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये हातात ‘शिवबंधन’ बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, विधानसभा संघटक सचिन सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, विभागप्रमुख रुपेश आमडोसकर, सिद्धेश राणे, मंगेश सावंत, अमित मयेकर, चेतन पाटील, शाखाप्रमुख प्रमोद सावंत, रवी सावंत, उमेश तारी, माजी सरपंच संजय सावंत, विलास सावंत, विजय शेट्ये, शाखा प्रमुख निलेश सावंत ,शाखाप्रमुख संतोष गुरव, प्रमोद गावकर, माजी सरपंच सतीश सापळे, विष्णू ठाकूर, रविकांत सावंत, मा. सेवानिवृत्त विस्तार अधिकारी उदय सरपे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)