ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
अन्यथा माझ्याशी तुमचा संघर्ष अटळ आहे : सुशांत दळवी.

अन्यथा माझ्याशी तुमचा संघर्ष अटळ आहे : सुशांत दळवी.

प्रकाशन: 30 Mar 2022 10:28 AM
वाचन संख्या 73

कळसुली गावांतील रस्ते पाणी व पुनर्वसनासह विकास कामे आधी सुरू करा नंतरच मुख धरणाचे काम सुरू करा.

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): कणकवली तालुक्यातील कळसुली गावात होत असलेल्या देनदोन वाडी प्रकल्पाला कळसुली ग्रामस्थांनी थांबवत प्रथम गावातील रस्ते पाणी व पुनर्वसन प्रश्न मार्गी लावावेत नंतरच प्रकल्प सुरू करावा अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांनी घेत कळसुली ग्रामस्थांच्या वतीने कार्यकारी अभियंता सिंधुदुर्ग यांना प्रकल्पाचे काम थांबवण्याचे पत्र दिले आहे

कळसुली गावात पायाभूत सुविधांचा मोठा अभाव असल्याने अधिकारी ग्रामस्थ व खासदार विनायक राऊत यांच्यासोबत बैठक झाली त्या बैठकीमध्ये गावातील रस्ते,पाणी,अंतरंग,सोयी सुविधा उभराव्यात नंतर मुख धरणाचे काम सुरू करावे अशी प्रमुख मागणी गावातील ग्रामस्थांनी केली होती.

सुशांत दळवी, संतोष मुरकर ,बळीराजा राणे,सुनील हरमलकर, वैभव मुरकर यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनात द्वारे केली आहे . कार्यकारी अभियंता यांनी सुशांत दळवी यांनी केलेली मागणी मान्य केली व सुरुवात डांबरीकरण रस्त्या पासून होईल असे सांगितले तसेच सुशांत दळवी यांनी प्रशासनाचे अधिकारी यांचे आभारही मानले

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स