ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार वैभव नाईक यांची हॅटट्रीक...!

आमदार वैभव नाईक यांची हॅटट्रीक...!

प्रकाशन: 29 Mar 2022 09:08 PM
वाचन संख्या 82

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सामान्यतः आजही दुचाकी खरेदी करणे हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नसते. त्यातकरुन आपल्या बहुतांश दिव्यांग बांधवांना ते आर्थिकदृष्ट्या आणखीनच खडतर असते.

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांची ही समस्या हेरुन त्या बांधवांना चारचाकी स्कुटरची भेट दिली. कुडाळ क्रीडा संकुल येथील शिमगोत्सव कार्यक्रमामध्ये आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघातील तब्बल २२ दिव्यांग बांधवांना चारचाकी स्कुटरचे वाटप पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यामुळे दिव्यांग बांधवांही आनंदित झाले होते. त्यांनी आम.वैभव नाईक यांचे आभार मानले.
समाजातील प्रत्येक घटकाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने आणि समाजातील दुर्लक्षित असलेल्या दिव्यांग बांधवांना काहीना काही मदत करण्याच्या हेतूने तसेच दिव्यांग बांधवांना स्वावलंबी करण्यासाठी आ. वैभव नाईक स्कुटर वाटपाचा उपक्रम राबवितात. गेली सलग ३ वर्षे त्यांनी सातत्याने हा उपक्रम राबविला आहे.


यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर,आमदार वैभव नाईक, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते सतीश सावंत संदेश पारकर,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे , जि. प. माजी गटनेते नागेंद्र परब, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, अमरसेन सावंत, हरी खोबरेकर, कुडाळच्या नगराध्यक्षा आफरीन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजन नाईक, बबन बोभाटे, संतोष शिरसाट, अतुल बंगे, जयभारत पालव, संजय आंग्रे, आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक, मुलगा राजवर्धन नाईक, राजू कविटकर,वर्षा कुडाळकर, श्रेया परब, स्नेहा दळवी,मथुरा राऊळ विकास कुडाळकर, संजय भोगटे, कृष्णा धुरी,शेखर गावडे, सचिन कदम, बाळा कोरगावकर, अनुप नाईक, दीपक आंगणे, सचिन काळप,सुशील चिंदरकर, रुपेश पावसकर, उदय मांजरेकर, किरण शिंदे, राजू गवंडे, श्रेया गवंडे,ज्योती जळवी,सई काळप, श्रुती वर्दम ,रामा धुरी,योगेश धुरी,मंदार गावडे, अमित भोगले,संदीप म्हाडेश्वर,दिनेश वारंग,चेतन पडते,राजेश म्हाडेश्वर,भूषण परूळेकर,कृष्णा तेली,पंकज वर्दम, मंजुनाथ फडके,कार्यालय प्रमुख गोट्या चव्हाण, स्वीय सहाय्यक बाबी गुरव,नितीन राऊळ आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स