ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ओसरगाव  क्रमांक १ शाळेत  स्वसंरक्षण व  कराटे कार्यशाळा!

ओसरगाव क्रमांक १ शाळेत स्वसंरक्षण व कराटे कार्यशाळा!

प्रकाशन: 29 Mar 2022 05:48 PM
वाचन संख्या 43

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : ओसरगाव क्रमांक १ या शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने स्वसंरक्षण व कराटे कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुप्रिया अपराध व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अँडव्होकेट विलास परब ,मार्गदर्शक तायक्वांदो ऑफ सिंधुदुर्गाचे प्रशिक्षक श्री भालचंद्र कुलकर्णी, जयश्री कसालकर ,ओमकार सावंत, अविराज खांडेकर , संतोष पवार तसेच माजी विध्यर्थी संघ सदस्य सुदर्शन नाईक लक्ष्मण आंगणे व किशोर तांबे मुख्याध्यापक किशोर कदम व शिक्षिका राजश्री तांबे, शितल दळवी उपस्थित होते. यावेळी मुलांना संरक्षणासाठी विविध शैली आत्मसात करण्यासाठी वेगवेगळी तंत्रे प्रात्यक्षिका सहीत शिकवण्यात आली. यामध्ये मुले आनंदाने कृतीयुक्त सहभाग घेऊन तंत्र अवगत केली. या कार्यशाळेमुळे मुलांच्या भविष्यातील शारीरिक व भावनिक विकासाबरोबर पुढे जात असताना स्वतःचे संरक्षण करणे तेवढेच गरजेचे आहे अशा कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांचे मन आणि शारीरिक क्षमता सुदृढ होतील असे ,.अँडव्होकेट विलास परब यांनी मुलांना शुभेच्छा देताना आपले मत प्रकट केले. व आयोजनाबदल मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकांचे अभिनंदन केले. कुलकर्णी सरांनी विद्यार्थ्यांना आपले शरीर आपले मन आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी यामधून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण आज मिळत आहेत त्यातून चांगले खेळाडू निर्माण होतात . आपल्या जिल्ह्यातून बलवान आणि गुणवान खेळाडू निर्माण करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो.या कार्यशाळेला या कार्यबल गटाचे केंद्रप्रमुख सुरेश हरकुळकर सर ग्रामपंचायत सदस्य हेमंत तांबे , ग्रामपंचायत सदस्य अक्षता राणे मॅडम यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. या कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री किशोर कदम यांनी केले आभार श्रीम.राजश्री तांबे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल दळवी यांनी केले.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स