ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
युवा सेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांच्या सौजन्याने आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त महिला बचत गटांना खुर्च्या, कपाट वाटप..
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

युवा सेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांच्या सौजन्याने आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त महिला बचत गटांना खुर्च्या, कपाट वाटप..

प्रकाशन: 25 Mar 2022 07:55 PM
वाचन संख्या 72

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सौजन्याने युवा सेनेच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली शहरातील माऊली वस्तीस्तर संघ पोयेकरवाडी, कनकसिंधु शहरस्तर संघ यांना बैठक व्यवस्थेसाठी 50 खुर्च्या आणि लोखंडी कपाट चे मोफत वाटप करण्यात आले.

एकूण http://localhost/news/public/uploads/20 बचतगटाच्या महिलांना याचा फायदा होणार आहे. महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी बचतगटाच्या माध्यमातून महिला संघटित होत विविध प्रश्न आणि समस्यांवर विचारविनिमय करण्यासाठी बैठकांचे आयोजन करतात. मात्र अशा बैठकांवेळी बैठक व्यवस्थेअभावी महिलांना सतरंजी अथवा चटईवर बसून चर्चा करावी लागत असे.महिला बचतगटांना बैठक व्यवस्थेसाठी खुर्च्या आणि कागदपत्रे व तत्सम सामान ठेवण्यासाठी लोखंडी कपाट मिळावे यासाठी माऊली वस्तीस्तर संघ अध्यक्षा दिव्या साळगावकर यांनी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्याकडे मागणी केली होती.त्यानुसार लागलीच सुशांत नाईक यांनी युवा सेनेच्या वतीने 50 खुर्च्या आणि लोखंडी कपाट उपलब्ध करून दिले. महिला भगिनींची बैठक व्यवस्थेची गैरसोय दूर करत खुर्च्या आणि कपाट दिल्याबद्दल दिव्या साळगांवकर आणि बचतगटाच्या उपस्थित महिला प्रतिनिधींनी आभार व्यक्त केले. यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, नगरसेविका माही परुळेकर, मानसी मुंज, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, युवा सेना तालुकाप्रमुख ललित घाडीगांवकर, युवा सेना शहरप्रमुख आदित्य सापळे, विभागप्रमुख सिद्धेश राणे, सचिन आचरेकर, शिवसेना कणकवली महिला शहरप्रमुख साक्षी आमडोसकर, रोहिणी मलये, सिद्धी शेट्ये, लक्ष्मी गुरव, संगीत सारंग, अर्पिता बुचडे, सुचिता सोनी आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स