ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
तिथीने असो वा असो तारखेने...दुर्गवीर प्रतिष्ठान अथक झटते छत्रपतींच्या निष्ठतेने..!

तिथीने असो वा असो तारखेने...दुर्गवीर प्रतिष्ठान अथक झटते छत्रपतींच्या निष्ठतेने..!

प्रकाशन: 22 Mar 2022 02:33 PM
वाचन संख्या 89

चिंदर | विवेक परब : फाल्गुन वद्य तृतीया (तिथीप्रमाणे) शिवजयंतीच्या औचित्याने मालवण तालुक्यातील रामगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत रामगड,मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहिम व शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने दिनांक http://localhost/news/public/uploads/20 आणि 21 मार्च रोजी दुर्गवीर प्रतिष्ठान आणि शिवप्रेमी यांनी रामगडावरील गणेश मंदिर परिसर, सदर आणि इतर परिसरातील झाडी साफ करत परिसर मोकळा केला.


दिनांक 21 मार्च रोजी छ. शिवाजी महाराजांचं पूजन रामगड सरपंच श्री. विलास घाडीगांवकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने दुर्गवीर, दुर्गप्रेमी, शिवप्रेमींसोबत रामगडचे मुख्य खोत मानकरी श्री. अभय प्रभुदेसाई, उपसरपंच श्री. फोंडके, बाळा मेस्त्री,बंटी हाटले, नरेश कामतेकर, स्वप्निल घाडीगांवकर, ओंकार गावकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


सरपंच श्री. घाडीगांवकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दुर्गवीर प्रतिष्ठान च्या वतीने गेली 7 वर्ष रामगडावर सुरू असलेल्या सातत्यपूर्ण कामाबद्दल समाधान व्यक्त करत दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या सर्व शिलेदारांचे कौतुक केले. आज दुर्गवीर मुळे पूर्णपणे झाडीझुडपांमध्ये दडलेला हा किल्ला मोकळा श्वास घेतोय तसेच रामगडाच्या संवर्धनासाठी गावच्या स्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन श्री.घाडीगांवकर यांनी दिले. श्री. प्रभुदेसाई यांनीही सर्व दुर्गवीरांशी संवाद साधत आगामी संवर्धन कार्यांच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.


दुर्गवीर प्रतिष्ठान ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर अपरिचित व दुर्गम गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी येथील यशवंतगड, मालवण मधील रामगड, भगवंतगड या किल्ल्यावर संस्थेचे काम चालते. प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी स्थानिक दुर्गवीरांच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमांचे आयोजन केले जाते. महाराजांच्या कार्याचे, स्वराज्याचे साक्षी असणारे हे गडकिल्ले जपण्यासाठी शिवप्रेमीनी दुर्गवीर सोबत सहभागी होऊन या शिवकार्यास हातभार लावावा असे आवाहन दुर्गवीर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष हसुरकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 315

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स