ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मनसेच्या वतीने सोंसुरा येथे शिवजयंती साजरी.

मनसेच्या वतीने सोंसुरा येथे शिवजयंती साजरी.

प्रकाशन: 21 Mar 2022 10:09 PM
वाचन संख्या 84

यशवंत गडावरील शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण…!

शिरगांव / संतोष साळसकर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस व माजी आमदार परशुराम ( जीजी) उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वेंगुर्ला व सावंतवाडी यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (तिथीनुसार) साजरी झाली.

सकाळी सोन्सुरा येथे शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जय शिवाजी , जय जिजाऊ , हर हर महादेव असा घोषणा देत शिव जयंती उत्सव साजरा केला. नंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यशवंत गडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर व महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष सनी बागकर यांनी पुष्पहार अर्पण करण्यात आला व जिलेबी वाटप करून शिव जन्मोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पदाधिकारी व कार्यकर्ते महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. म.न.वि. सेना जिल्हा अध्यक्ष कुणाल किनळेकर, मनविसे उप जिल्हाध्यक्ष परशुराम (आबा) परब, मनसे तालुका अध्यक्ष सनी बागकर , मनसे तालुका सचिव वेंगुर्ला आबा चिपकर , मनविसेना उप तालुका अध्यक्ष विशाल मांडये, संदेश शेट्ये , निलेश मुळीक ,गोविंद (आपा) मातोंडकर हे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 297

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स