कळसुली पुनर्वसनग्रस्तांची खासदार विनायक राऊत यांनी घेतली भेट
कणकवली | उमेश परब : कळसुली गावांतील पुनर्वसन भागात १०० हुन अधिक रहिवाश्याना भेडसावणाऱ्या अडी-अडचणी बरीच वर्षे १८नागरी सुविधा व समस्या वाऱ्यावर होत्या. रस्ता,व स्वेच्छा पुनर्वसन मधील नागरिकांची उन्हाळी हंगामात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती.तसेच पुनर्वसन कडे येणारा ३कि.मी.रस्त्यावर भले मोठे खड्डे पडल्याने एसटी वाहतूक बंद होती, कळसुली देदोनवाडी धरणाचं काम बरेच वर्षे रेंगाळले,बंधाऱ्याचा काही भागावर भगदाड पडली,तसेच धरणाच्या बंधाऱ्यावर वाढलेली झाडे तातडीने तोडा,कळसुली गावातील गडगेवाडी रस्ताची डागडुजी व्हावी,बीएसएनएल टॉवरचे नेटवर्क अचानक गायब होत. या बाबत ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांच्या समोर पुनर्वसन मधील भेडसावणाऱ्या समस्यावर चर्चा करून, ग्रामस्थांनी निवेदन दिली.
लघुपाटबंधारे अधिकारी यावेळी उपस्थित होते. कळसुली दिडवडेवाडी ते पणदूर घोडगे राज्यमार्ग पर्यंत ३ कि.मी.रस्ता गणेश चतुर्थीपूर्वी वाहतुकीस निर्धोक करणार अस आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी प्रकल्प ग्रस्तांना दिलं.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, माजी जी.प.स.बाळा भीसे,अतुल रावराणे, जी.प.स.लॉरेन्स मान्यवर,जिल्हाप्रमुख संजय पडते,नगरसेवक सुशांत नाईक, अँड शैलेश भोगले,सचिन सावंत,रुपेश आमडोसकर,
उप विभागीय अभियंता एस व्ही हिरेगाडर,आर व्ही राणे,देदोनवाडी प्रकल्प ग्रस्त तसेच कळसुली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)