ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
महिलांनी आर्थिक सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत : ॲड. नम्रता नेवगी.

महिलांनी आर्थिक सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत : ॲड. नम्रता नेवगी.

प्रकाशन: 20 Mar 2022 09:57 AM
वाचन संख्या 35

मडूरेत संजिवनी ग्रामसंघातर्फे महिला दिन संपन्न.

बांदा : राकेश परब : महिलांनी आर्थिक सक्षम होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी व्यवसाय करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. महिलांवरील अत्याचार, कायदे, हक्क याबाबत महिलांनी सजग असावे. मुली सुशिक्षित होण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन अँड. नम्रता नेवगी यांनी मडुरा येथे केले.


मडुरा येथील संजिवनी ग्रामसंघाच्या वतीने जागतिक महिला दिन आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी अॅड. नम्रता नेवगी, मडुरा सरपंच साक्षी तोरसकर, संजिवनी ग्रामसंघाच्या अध्यक्षा तन्वी परब, मडुरा आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. तेजस्विनी माजगावकर, अंगणवाडी सेविका पल्लवी परब आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. माजगावकर म्हणाल्या, दैनंदिन कामाच्या व्यापात महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष केल्यास आजार बळावण्याचा धोका असतो. महिलांनी आरोग्याबाबत सजग राहिले पाहिजे. कोणतीही गंभीर समस्या असल्यास डॉक्टरांशी बोलून आवश्यक चाचण्या करुन त्वरीत उपचार घेतले पाहिजेत असे आवाहन केले.


यावेळी अध्यक्ष तन्वी परब यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकात संजिवनी ग्रामसंघाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी महिलांसाठी समुह गीते, डान्स, वक्तृत्व व कविता वाचन यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रतिक्षा शेट्ये यांनी केले. कार्यक्रमाला ग्रामसंघाचे सर्व पदाधिकारी, कॅडर व सर्व समुहांच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 445

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स