शिरगांव मध्ये कष्टकरी व कर्तबगार महिलांचा झाला विशेष सन्मान..!
शिरगांव येथे शिवसेना महिला आघाडी व शिरगांव महिला मंडळ यांच्यावतीने साजरा झाला महिला दिन .
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन शिरगांव येथे शिवसेना महिला आघाडी व शिरगांव महिला मंडळ यांच्यावतीने कर्तबगार महिलांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी महिलांना विरंगुळा मिळावा म्हणुन फनी गेम्स, संगीत खुर्ची आणि डान्सचे नियोजन देखील करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शिवसेना युवानेत्या कु.रुची विनायक राऊत यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले . तसेच शिवसेना महिला आघाडीच्या सौ.प्रतिक्षा साटम यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
या कार्यक्रमाला शिवसेनेच्या मिनल मिलिंद साटम, शिरगाव ग्रा.प.सदस्या स्नेहल मेस्त्री, रेश्मा साटम, अनुसया साटम, सविता साटम, सुनिता साटम यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. सर्व मान्यवर महिलांचे स्वागत शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख पूर्वा सावंत यांनी केले. यावेळी महिला ग्रामपंचायत सदस्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक बांधिलकी जपुन 10 कष्टकरी महिलांचा विशेष भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विविध स्पर्धातील विजेत्या महिलांना बक्षिसे देण्यात आली.
या कार्यक्रमाला महिला आघाडीच्या सुरेखा मेस्त्री, विभा घाडी, उमा घाडी, दिशा साटम, करुणा वाडिये, शेवंती वाडीये , दिपाली घाडी, शोभा मेस्त्री, करिश्मा घाडी, अक्षता घाडी, प्रगती राणे, अर्पिता देवळेकर, रुतिका देवळेकर, पियुशा साटम, हर्षदा सावंत, पुजा सावंत, महिमा वाडिये, जान्हवी देवळेकर, सांवी तोरसकर, मानसी साटम, मेघना राणे, निधी साटम, समिक्षा ठुकरुल, दिव्या साटम, वर्षा साटम, प्रेरणा साटम, अनुराधा साटम, सविता साटम, भारती साटम, रुपाली घाडी आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमात आवर्जुन सहभागी झालेल्या सर्व महिलांचे आणि मान्यवरांचे शिवसेना महिला आघाडीच्या आयोजक सौ.प्रतिक्षा साटम यांनी आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)