ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
बांदा येथे वेषभुषा स्पर्धेत सौ भक्ती आळवे प्रथम
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बांदा येथे वेषभुषा स्पर्धेत सौ भक्ती आळवे प्रथम

प्रकाशन: 13 Mar 2022 06:19 PM
वाचन संख्या 57

बांदा | राकेश परब : बांदा येथील श्री साईबाबा भक्त सेवा मंडळ बांदा व बांदा नट वाचनालय यांच्या सयुक्त विद्यमानाने महीला दिनाचे औचीत्य साधुन खास विवाहीत महीलांसाठी वेशभुषा स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद लाभला . या स्पर्धेचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, डॉ. सौ सोनल लेले. यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी गणेश ठाकुर, बांदा नट वाचनालयचे उपाध्यक्ष सुभाष मोर्ये , निलेश मोरजकर , सौ सरोज नाईक, बांदा माजी सरपंच प्रियांका नाईक, श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या विश्वस्ता सौ दर्शना केसरकर. सौ राजश्री तेंडले , सौ प्रियांका हरमलकर , बांदा नट वाचनालयाच्या महीला सदस्या सौ स्वप्निता सावंत , मान्यवर म्हणुन उपस्थित होत्या . या स्पर्धेत सौ भक्ती आळवे यानी प्रथम क्रमांक, सौ श्वेता कोरगांवकर द्वितीय क्रमांक, सौ स्वाती पाटील त्रुतीय क्रमांक, पटकावीला . वअनुजा महाजन, रिना मोरजकर, विनीता गोसावी वर्षा नाडकर्णी सरोज नाईक याना उत्तेजनार्थ पारीतोषीक देण्यात आले. या वेळी पुडंलीक दळवी यानी आपले विचार मांडताना बांदा नट वाचनालय व श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाने महीलांसाठी हि स्पर्धा आयोजीत‌ करून महीलांना व्यासपीठ देऊन त्याच्या सुप्त गुणाना , कलेला वाव मिळवून दिल्या बद्ल कौतूक केले. परीक्षक डॉ सौ सोनल लेले यानी आपले विचार मांडताना जेष्ठ महीलानी या स्पर्धेत सहभागी आपली कला दाखवीली या बद्दल कौतुक केले. सौ सोनल लेले व‌ गणेश ठाकुर यानी या स्पर्धचे परीषण केले. या कार्यक्रमाचे प्रास्तावीक साईबाबा भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष व‌ बांदा नट वाचनालयाचे सचीव राकेश‌ केसरकर व सुत्रसंचालन व आभार जकाप्पा पाटील सर यानी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स