ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
डिंगणे कबड्डी स्पर्धेत पणजी संघ विजेता

डिंगणे कबड्डी स्पर्धेत पणजी संघ विजेता

प्रकाशन: 12 Mar 2022 11:02 AM
वाचन संख्या 106

बांदा | राकेश परब : सावंतवाडी तालुका भारतीय जनता पार्टी पुरस्कृत व कै. किशोर सावंत मित्रमंडळ डिंगणे आयोजित ४५ व्या कबड्डी महोत्सवाचे विजेतेपद पणजी – गोवा संघाने पटकाविले. रेवतळे (मालवण) संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेला सिंधुदुर्गसह गोवा राज्यातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डिंगणे येथे सावंतवाडी तालुका भाजपा पुरस्कृत कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

विजेता पणजी गोवा संघाला दयानंद सावंत पुरस्कृत किशोर चषक व प्रमोद कामत पुरस्कृत १५ हजार रुपयांचे पारितोषिक भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, तर उपविजेता रेवतळे मालवण संघाला उत्तमदादा चषक व भाजपा जिल्हा प्रवक्ते संजू परब पुरस्कृत १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. सिंहगर्जना आयनोडे (दोडामार्ग) संघाला तृतीय क्रमांकाचा आत्माराम चषक व जि. प. सदस्य श्वेता कोरगावकर पुरस्कृत ३ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तसेच लक्ष्मीनारायण वालावल संघाला चंद्रकांत चषक व जि. प. सदस्य श्वेता कोरगावकर पुरस्कृत २ हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके पुढीलप्रमाणे – मालिकावीर सुमीत राठी, पणजी, उत्कृष्ट चढाई जतीन कांबळी, मालवण, उत्कृष्ट पकड लक्ष्मण गावडे, पणजी, आदर्श खेळाडू जीत पाटील, आयनोडे, शिस्तबद्घ संघ माऊली कळणे संघ.पारितोषिक वितरण कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर, भाजपा तालुकाध्यक्ष महेश धुरी, प्रदेश सदस्य मंदार कल्याणकर, आबा धारगळकर, सुधीेर शिरसाट, बाळा आकेरकर, सुनील धामापूरकर, बाळासाहेब बांदलकर, नाना नाईक, प्रमोद सावंत, सुनील राऊळ, इन्सुली ग्रा. पं. सदस्य स्वागत नाटेकर, शिरोडकर सर उपस्थित होते.

स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे दिनेश चव्हाण, सिताराम रेडकर , विश्राम नाईक, वैभव कोंडसकर , कृष्णा सावंत, जयेश परब, विजयकुमार साळुंखे , तुषार साळगावकर , सी. ए. नाईक व शैलेश यांनी पंच म्हणून कामगिरी पाहिली . हजारो कबड्डी प्रेमींनी स्पर्धेचा लाभ घेतला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स