ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पूर्ण प्राथमिक शाळा भरणी नं. १ प्रशालेत जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पूर्ण प्राथमिक शाळा भरणी नं. १ प्रशालेत जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न

प्रकाशन: 12 Mar 2022 10:53 AM
वाचन संख्या 135

शिरगाव | संतोष साळसकर : महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण व्हावे, महिला ही अबला नसून ती सबला आहे अशी जाणीव नव्या पिढीच्या मनात रुजावी व महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा , येणाऱ्या काळात पुरुषप्रधान संस्कृतीत वावरताना मुलींनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे, तसेच महिलांनीही महिलांबाबत बोलताना जाणीवपूर्वक बोलावे.

आपण सहज बोलून जातो त्याचे पडसाद महिलांबाबत वाईट संदेश पसरतो . असे प्रतिपादन सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्या रुपाली कदम कलमठ यांनी केले. प्राथमिक शाळा भरणी नं. १ प्रशालेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ८ मार्च हा जागतिक महिला दिनानिमित्त जागृत ग्रामसंघ भरणी, ग्रामपंचायत भरणी, शाळा स्थापन समिती जिल्हा परिषद शाळा भरणी नंबर 1 यांच्या संयुक्त विद्यमाने महीला मेळावा संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा साक्षी संजय लाड, बचत गटांचे अध्यक्ष.तसेच उपशिक्षिका कोमल जाधव, शाळा समितीचे अध्यक्ष सायली पालकर व प्रमुख मार्गदर्शक रूपाली कदम(मुंबई) उपस्थित होत्या, सुरुवातीला विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून शाळेतील मुलींनी भारतातील कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषा साभिनय सादर केल्या.तसेचया दिनाचे औचित्य साधून गावातील महिलांनी विविध प्रकारच्या प्रबोधनात्मक रंगावली रेखाटल्या होत्या, ‘बेटी बचाओ, बेटी बचाओ ‘ महिला सबलीकरण अशा आशयाचे संदेश देणा-या सुबक रंगावली साकारल्या होत्या. त्या कक्षाचे उद्घाटन प्रशाळेचे मुख्याध्यापक संतोष तांबे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यात सायली पालकर, गीता गुरव, मनस्वी तांबे यांना तीन गुणानुक्रम काढून गौरवण्यात आले . या रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुशांत कदम, रासम सर व ढवण सर यांनी काम पाहिले. तसेच या मेळाव्यात दुपारी बारा ते दोन या वेळात सिंधुताई सपकाळ चित्रपट दाखवण्यात आला .तसेच दुपारच्या भोजनानंतर विविध फनी गेम्सनी मेळाव्यात रंगतदार आली . त्यात संगीत खुर्ची, बादलीत चेंडू टाकणे व अंताक्षरी स्पर्धा घेण्यात आली. अंताक्षरी स्पर्धेत सर्वच महिलांनी सुरेल आवाजात उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले. यावेळी 8 मार्च च्या निमित्ताने कर्तृत्वशाली महिलांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी गावातील 8 जेष्ठ महीला नागरिकांचा सत्कार शाळेतील शिक्षकांच्या शुभहस्ते करण्यात आला आला. व फनिगेम्स स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी सरपंच प्रकाश घाडी, पंचायत समिती सदस्य गणेश तांबे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल बागवे, ग्रामसेवक बाबासाहेब निर्मल, सुरेखा डेकोरेटरचे मालक संजय लाड, अजय लाड, प्रकाश बागवे ,महेश परब तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संतोष तांबे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सायली पालकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री रासम सर यांनी केले

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स