रोझरी इंग्लिश स्कूल मालवणमध्ये ध्वजारोहण संपन्न
मालवण | वैभव माणगांवकर : मालवण शहरातील रोझरी इंग्लिश स्कूल येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण संपन्न झाले. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्साल्व्हीस यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी सहकारी फादर मरियादास आणि प्रशालेचे शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते. कोरोना काळामुळे ध्वजारोहण केवळ प्रशालेच्या ठराविक कर्मचार्यांच्या उपस्थितीत पार पडले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)