सत्यवान रेडकर यांनी प्रशासकीय अधिकार्यांना सुनावले खडे बोल..!
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या सज्जांकित मुलाखत मालिकेतून मांडली अत्यावश्यक शैक्षणिक भूमिका.उद्या सकाळी 8 वाजता प्रसारित होणारी मुलाखत.
मालवण | विनीत मंडलिक : महाराष्ट्र राज्यातील,कोकणातील आणि खासकरुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी विद्यार्थ्यांसाठी ,समाजासाठी नेमके काय आणि किती वैयक्तिक योगदान देतात, असा खडा सवाल श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांनी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या सज्जांकित मुलाखत मालिकेतील संवादा दरम्यान उभा केला आहे. श्री. सत्यवान यशवंत रेडकर हे तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे संस्थापक व मुख्य मार्गदर्शक आहेत.महाराष्ट्र राज्यभर विविध ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, मोटीव्हेशनल वक्ता आणि शिक्षण प्रेरक म्हणून त्यांची निःशुल्क व्याख्याने होत असतात.
प्रशासकीय सेवांमधील अधिकारी पदे वगळता अन्य पदांचीही माहिती मुलांपर्यंत पोहोचावी आणि त्यासाठी पालकांनीही नेमके काय करावे यांवर श्री.सत्यवान रेडकर यांनी या मुलाखतीतून स्पष्ट केले आहे.
उद्या सोमवार दिनांक 7 मार्चला सकाळी 8 वाजता त्यांची ही शैक्षणिक आस्थेची तुफान वादळी मुलाखत आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलवर प्रसारीत होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)