ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मसुरे खेरवंदवाडीत साहित्यिक विजय जोशी यांचा सत्कार

मसुरे खेरवंदवाडीत साहित्यिक विजय जोशी यांचा सत्कार

प्रकाशन: 06 Mar 2022 04:44 PM
वाचन संख्या 138

चिंदर | विवेक परब : मालवण तालुक्यातील मसुरे खेरवंदवाडी येथे जेष्ठ साहित्यिक श्री. विजय जोशी यांचा सत्कार समारंभ अनुक्रमे त्यांना शिक्षण देणारे प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री. गोविंद सोनू बागवे(वय९२ वर्षे )गुरुजी यांच्या हस्ते व त्रिंबक गावच्यावतीने साहित्यिक श्री. सुरेंद्र(अण्णा) सकपाळ व एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संपन्न झाला.

सत्कारानंतर बोलताना जोशी म्हणाले की माझा सत्कार माझ्या शाळेतील गुरुजनांच्या हस्ते होण हा सुवर्ण योगच आहे. मी आज भारावून गेलो आहे. आपल्या काव्य प्रवासाची सुरुवात कशी झाली तो कसा बहरत गेला, साहित्य क्षेत्रात आपण कसे नावारुपाला आलो हे त्यांनी कवितांच्या माध्यमातून कथन केले.

यावेळी चर्चासत्र, मार्गदर्शन व सौ. वर्षाताई अभ्यंकर, एकनाथ गायकवाड व सुरेंद्र(अन्ना) सकपाळ यांनी कविता सादर केल्या. कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समारोप श्री. गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स