आजपासून रंगतेय रोणापाल प्रिमीअर लीग स्पर्धा.
बांदा | राकेश परब : रोणापाल प्रिमीअर लीग २०२२ ही क्रिकेट स्पर्धा शनिवार ५ व रविवार ६ मार्च रोजी संपन्न होत आहे. रोणापाल ग्रामपंचायत नजीकच्या मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक तानाजी गावडे पुरस्कृत २५ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक निरवडे सरपंच हरी वारंग पुरस्कृत २० हजार रुपये आहे. त्याशिवाय वैयक्तिक स्वरुपाची पारितोषिके व चषक पुरस्कृत करण्यात आली आहेत.
स्पर्धेचे सर्व चषक कै. नकुल गावडे स्मरणार्थ अमीत गावडे पुरस्कृत आहेत. स्पर्धेत रोणापाल, निगुडे, कास, मडुरा, इन्सुली, शेर्ले, सक्राळ व नेमळे हे आठ संघात सहभागी होणार आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)