ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कनक रायडर्सच्या सायकलपटूंनी २०० किमी सायकलिंग करत साजरा केला अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन

कनक रायडर्सच्या सायकलपटूंनी २०० किमी सायकलिंग करत साजरा केला अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन

प्रकाशन: 16 Aug 2021 04:40 PM
वाचन संख्या 40


कणकवली / उमेश परब :-भारत देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन देशभरात झेंडावंदन करून साजरा केला गेला तसाच अनेक भारतीयांनी अगदी नाविन्यपूर्ण कल्पकतेनेही अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा केला. कणकवलीतील सायकल रायडर्स चा ग्रुप असलेल्या कनक रायडर्स च्या सायकलपटूंनी स्वातंत्र्यदिनी २०० किमी सायकलिंग पूर्ण करत तिरंग्याला मानवंदना दिली. कनक रायडर्सचे मकरंद वायंगणकर, विष्णू रामागडे, नितांत राजन चव्हाण या सायकलपटूंनी १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजता कणकवली हुन सायकल ने झाराप च्या दिशेने कूच केले. मकरंद वायंगणकर आणि विष्णू रामागडे यांनी झाराप हुन ओरोस रिटर्न आणि ओरोस हुन झाराप व झाराप ते वारगाव आणि वारगाव ते कणकवली असा प्रवास करून २०२ किमी सायकलिंग पूर्ण केले. तर एस. एम.हायस्कुल चा दहावी चा विद्यार्थी असलेल्या नितांत चव्हाण याने झाराप हुन कणकवलीत येत पुन्हा कुडाळ पर्यंत अंतर सायकलिंग ने पूर्ण केले. स्वातंत्र्यदिनी किमान ३०० किमी सायकलिंग पूर्ण करण्याच्या इराद्याने नितांत चव्हाण याने एकट्यानेच कुडाळहून लांजा पर्यंत सायकलिंग केले. लांजाहून कणकवली च्या दिशेने येत असताना वाकेड घाटात सायकलच्या ब्रेक केबल तुटल्यामुळे २२३ किमी अंतर झाले असताना नितांत ला सायकलिंग थांबवावे लागले. कणकवली च्या कनक रायडर्स च्या सायकलपटूंनी सायकलिंग करत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी तिरंग्याला दिलेल्या मानवंदनेबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स