ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
पद्मश्री परशुराम गंगावणेंच्या हस्ते भारताच्या मैदानी खेळाच्या राजाचा गौरव..!

पद्मश्री परशुराम गंगावणेंच्या हस्ते भारताच्या मैदानी खेळाच्या राजाचा गौरव..!

प्रकाशन: 22 Feb 2022 08:26 PM
वाचन संख्या 71

आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर मेस्त्री राष्ट्रीय कर्तृत्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. परशुराम गंगावणे यांच्या हस्ते क्रीडा, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर निःस्वार्थपणे भरीव कामगिरी करीत महाराष्ट्राचे नांव सर्वदूर करणारे भूतपूर्व फेडरेशन रेफरी तसेच स्पर्धा नियंत्रक श्री. अशोक गणेश दाभोलकर-मेस्री, दाभोली, वेंगुर्ला सिंधुदुर्ग ह्याना ” राष्ट्रीय कर्तृत्व जीवनगौरव पुरस्कार २०२२” ने सन्मानित करण्यात आले.
किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग,सह्याद्री राष्ट्रीय गड किल्ले साहित्य कला संमेलन, सिंधुदुर्ग २०२२, कार्यक्रमात सदर पुरस्कार देण्यात आला.
विश्राम पपेट थिएटर्स, कला आंगण, पिंगुळी, गुढीपूर, कुडाळ येथे संपन्न झालेल्या ह्या संमेलनात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या रत्नांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षणमहर्षी मा. प्रि. आर. एल. तांबे, जेष्ठ उद्योजक व समाजसेवक सर्वश्री. प्रकाश गायकवाड (रायगड), सुधीर जाधव ( उद्योजक, कणकवली), संतोष कदम (उद्योजक, सिंधुदुर्ग), बाळकृष्ण उर्फ दिनेश गोरे ( अध्यक्ष, पुरस्कार निवड समिती) प्रा. श्री. बी. एन. खरात ( अध्यक्ष किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग) आदी मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स