ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत वीज कर्मचाऱ्यांचा गौरव
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत वीज कर्मचाऱ्यांचा गौरव

प्रकाशन: 16 Aug 2021 10:26 AM
वाचन संख्या 175

बांदा | राकेश परब : सध्याच्या काळात जीवनावश्यक ठरलेली वीज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दऱ्या, डोंगरातून वीज ग्राहकांना पोचवणाऱ्या वीज कामगारांचा सन्मान १५ स्वातंत्र्य दिनाचे  औचित्य साधून करण्यात आला.  यावेळी श्रीराम सडवेलकर, सूर्यकांत कांबळे, पद्माकर सातार्डेकर, शशिकांत कुंभार , गौरेश कर्पे, दयानंद कदम, सत्यवान मुळीक, मिलिंद कदम, संजय मोरे, जयवंत घाडी या उपविभागीय कार्यालयात तांत्रिक कामगारांना, तर मळेवाड येथील इनायातुल्ला राजगुरू आणि कुंभार माठ येथील सतीश नाईक या प्रधान यांत्राचालकाना सन्मान करण्यात आला.
     काल स्वातंत्र्यदिनी अधिक्षक अभियंता श्री विनोद पाटील यांनी या गुणवान वीज कामगारांचा सन्मान चिन्ह आणि विशेष गुणगौरव पत्र देऊन गौरव केला.यावेळी श्री लोकरे, कार्यकारी अभियंता, सौ. कांबळे, व्यवस्थापक (मास) तसेच महावितरण कंपनी चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.गावोगावी, जंगल, दऱ्या डोंगरातून वीज वाहिनीवर काम करणारे वीज कामगार हाच व्यवस्थेचा कणा आहे आणि त्यांचे परिश्रम नेहमीच दखल घेण्यासारखे आहेत असे प्रतिपादन अधीक्षक अभियंता श्री विनोद पाटील यांनी केले आहे. सन्मान प्राप्त वीज कामगारांवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स