ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
युवासेनेच्या सिंधुदुर्गातील कामाची आदित्य ठाकरेंनी केली प्रशंसा...!

युवासेनेच्या सिंधुदुर्गातील कामाची आदित्य ठाकरेंनी केली प्रशंसा...!

प्रकाशन: 16 Feb 2022 06:00 PM
वाचन संख्या 90

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्हा युवा सेना जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्यावर व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर संचालक म्हणून निवडून आल्यानंतर कणकवली नगरपंचायतचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी मुंबईत युवासेना प्रमुख व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी युवा सेना जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल व जिल्हा बँक संचालक पदी मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल सुशांत नाईक यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी सुशांत नाईक यांच्यासोबत आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर उपस्थित होते.तसेच युवासेनेच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर सुशांत नाईक यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवा सैनिकांचे संघटन करून शिवसेना पक्ष वाढीच्या दृष्टीने सुरु असलेल्या उपक्रमांचे आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या काळात सर्व सत्तास्थाने शिवसेनेकडे आली पाहिजे त्यासाठी काम सुरू करा असा कार्य आदेश त्यांना दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोकण व सिंधुदुर्गावर विशेष प्रेम असून जनतेच्या अडिअडचणी सोडविण्यासाठी शिवसेना यापूर्वीही अग्रेसर होती व यापुढेही राहील अशी हमी देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्याचे सुशांत नाईक यांनी सांगितले. ही भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी व युवासेनेसाठी सकारात्मक ठरल्याचे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स