ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हुंबरट येथे इनोव्हा कारची लक्झरीला धडक..!

हुंबरट येथे इनोव्हा कारची लक्झरीला धडक..!

प्रकाशन: 13 Feb 2022 03:01 PM
वाचन संख्या 51

इनोव्हा कारमधील प्रवाशी गंभीर जखमी

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली हुंबरठ येथे इनोव्हा कार व खाजगी बसचा आज सकाळी १० च्या दरम्यान अपघात झाला. अपघातात कारमधील तीन जण गंभीर तर पाच जणांना मोठी दुखापत झाली आहे. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही कार गोव्याच्या दिशेने जात असताना दुरुस्तीसाठी थांबलेल्या खाजगी बसवर धडकली असल्याची माहिती मिळाली आहे.

इनोव्हा कारमध्ये बहुतांशी महिला प्रवाशी होत्या. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. यावेळी स्थानिक रहिवासी नंदन पाटील यांच्यासह इतर जणांनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली. यावेळी वाहतूक पोलीस संदेश आबिटकर व सागर मासाळ हे उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स