ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्गतर्फे बिळवस हायस्कुल येथे विद्यार्थिनींना सायकल वाटप..!

जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्गतर्फे बिळवस हायस्कुल येथे विद्यार्थिनींना सायकल वाटप..!

प्रकाशन: 13 Feb 2022 02:47 PM
वाचन संख्या 33

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने माध्यमिक विद्यालय बिळवस येथे पाच विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले.
भूमी रविंद्र परब (महारिंग्रेवाडी), सानिका शिवाजी क्षीरसागर (आंगणेवाडी), निर्जरा नागनाथ चव्हाण( कातवड ), वैष्णवी विश्वास घाडी( महान) ,
सानिका दिलिप हळवे-परब (महान) याना
सायकल वाटप बिळवस ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत जगन्नाथ पालव, जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग मालवण तालुका पदाधिकारी श्री.विलास हडकर, विद्यार्थिनींचे पालक, माध्यमिक विद्यालय बिळवस चे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सदर सायकली उपलब्ध करून देण्यासाठी विजय केनवडेकर (उपाध्यक्ष जनशिक्षण संस्था मालवण), विलास हडकर(पदाधिकारी जनशिक्षण संस्था मालवण) व प्रकाश साळुंखे (महान) यांनी सहकार्य केले. या सेवाभावी मदतीबद्दल बिळवस ग्रामसेवा मंडळ मुंबई व माध्यमिक विद्यालय बिळवस तर्फे विशेष आभार मंडळाचे सरचिटणीस अशोक जनार्दन पालव यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स