ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बंड्या खोत मित्रमंडळाच्या मदतीने आदिवासी भारावले!

बंड्या खोत मित्रमंडळाच्या मदतीने आदिवासी भारावले!

प्रकाशन: 01 Aug 2021 08:35 PM
वाचन संख्या 100

दुर्गम भागातील कातकरी वस्ती व इतर गरजू ग्रामस्थांना ७०० पॅकेट गृहपयोगी साहित्य वाटप

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील ‘बंड्या खोत मित्र मंडळाच्या वतीने’ रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व खेड येथील आदिवासी पाड्यावरील सुमारे पाचशे कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले. सापीर्ले मधलीवाडी, कातरकरवाडी, रामवाडी, देऊळवाडी, भराडवाडी, बौद्धवाडी, सीमेचीवाडी, रामवाडी आदी वाड्यावर जात ही मदत बंड्या खोत यांनी सहकाऱ्यांच्या साथीने वितरित केली. मंडळ अधिकारी राजाराम घुले, तलाठी सुदिल कांबळे यांनी यावेळी दिवसभर अन्नधान्य किट वाटप करताना उपस्थित राहत सहकार्य केले.
सदर भागात कुणाचीही मदत पोहोचली नव्हती. गावात पोहोचणाऱ्या मार्गावरील पूल अर्धवट खचले आहेत. तरी पण खऱ्या गरजवंतांना मदत पोहोचावी या हेतूने या खचलेल्या पुलावरून गाडी नेत जीवनावश्यक साहित्य कातकरी ग्रामस्थां सह इतर वाड्यातील रहिवाश्यांना पोहोच करण्यात आल्याची माहिती बंड्या खोत यांनी दिली. शासनाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा गरजवंतांना मदत पोहोच केल्याबद्दल बंड्या खोत मित्र मंडळाचे आभार मानले.रस्त्या अभावी अनेक कुटुंबांना स्थानिकांच्या मोटारसायकल घेत बंड्या खोत यांनी मदत पोहोच केली. अन्नधान्या सह कपडे व इतर साहित्याचे सुमारे सातशे किट तोंडवळी येथील श्री वाघेश्वर देवालयात बनविण्यात आले. चिपळूण तसेच खेड येथील अनेक पूरग्रस्त भागात अद्याप मदत पोहोचली नाही आहे. ग्रामस्थ अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे दात्यांनी, अथवा मंडळांनी मदत देताना खरोखरच ज्यांना आवश्यकता आहे अशाच लोकांना मदत पोहोच करण्याचे आवाहन बंड्या खोत यांनी केले आहे. मदत केलेल्या सर्वांचे बंड्या खोत यांनी आभार मानले आहेत. चिपळूण येथे बंड्या खोत यांच्या सह ज्ञानेश गोलतकर, मयूर वायंगणकर, दिनेश कांबळी आदी मदत वाटपात सहभागी झाले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 288

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स