ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
विजयदुर्ग किल्ला दुरावस्था प्रश्नी अधिवेशनामध्ये आवाज उठवण्याचे आमदार वैभव नाईक यांचे आश्वासन..!

विजयदुर्ग किल्ला दुरावस्था प्रश्नी अधिवेशनामध्ये आवाज उठवण्याचे आमदार वैभव नाईक यांचे आश्वासन..!

प्रकाशन: 12 Feb 2022 05:37 PM
वाचन संख्या 82

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आमदार नाईक यांची भेट.

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ला दुरवस्था संदर्भात हिंदु जनजागृती समितीने मोहीम हाती घेतली आहे. विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन व्हावे यासाठी विविध माध्यमातून समिती आवाज उठवत आहे आपणही याप्रश्‍नी लक्ष घालून अधिवेशनामध्ये आवाज उठवावा असे निवेदन हिंदू जनजागृती समितीतर्फे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना देण्यात आले. आमदार नाईक यांनी आपण निश्चित पणे अधिवेशनामध्ये याप्रश्नी आवाज उठवू, असे आश्वासन समितीच्या कार्यकर्त्यांना दिले. यावेळी समितीचे श्री जयवंत सामंत आणि मिलिंद पारकर उपस्थित होते.
छत्रपती शिवराय आणि मराठा सरदारांच्या पराक्रमाची साक्ष असलेले अनेक किल्ले राज्यात असून त्यांची दुरावस्था झाली आहे. पुरातत्व विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. आपला हा ऐतिहासिक ठेवा सुरक्षित रहावा यासाठी हिंदू जनजागृती समितीने राज्यातील गडकोट संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 25 ग्रामपंचायतींमध्ये ठराव घेण्यात आले. विविध स्तरातील प्रतिष्ठीत आणि दुर्गप्रेमी यांच्या भेटी घेऊन हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात आला. विजयदुर्ग किल्ल्यावरही परिसरातील ग्रामस्थांनी निदर्शने केली. याविषयी ट्विटरवर ऑनलाइन ट्रेंडही चालविण्यात आला. तालुका पातळीवर तहसीलदारांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले. त्या प्रश्नी शासनाच्या पातळीवर ठोस निर्णय व्हावा, म्हणून अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी लोकप्रतिनिधींची भेट घेण्यात येत आहे. या अंतर्गत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना भेटून यासंबंधीचे निवेदन सादर करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स