ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
युवानेते संदेश पारकरांचा उमेदवारांसह गोव्यात भगवा झंझावात..!

युवानेते संदेश पारकरांचा उमेदवारांसह गोव्यात भगवा झंझावात..!

प्रकाशन: 11 Feb 2022 02:56 PM
वाचन संख्या 98

गोवा निवडणुकीच्या प्रचारार्थ संदेश पारकरांची घरोघरी प्रचारावर भर देत जोरदार मोर्चेबांधणी.

कणकवली | उमेश परब ( सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते गोव्यात ठाण मांडुन आहेत. श्री.पारकर हे शिवसेना उमेदवारांसोबत घरोघरी जाऊन प्रचार करण्याला प्राधान्य देत आहेत. संदेश पारकर हे शिवसेना खासदार प्रवक्ते श्री.संजय राऊत, शिवसेना सचिव खासदार श्री.विनायक राऊत, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.उदय सामंत, माजी राज्यमंत्री आमदार श्री.दिपक केसरकर, शिवसेना सचिव श्री.सुरज चव्हाण, मुंबई महापौर सौ.किशोरी पेडणेकर, खासदार श्री.अरविंद सावंत, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, युवासेना सचिव श्री.वरुण सरदेसाई, युवासेना सरचिटणीस श्री.अमोल कीर्तिकर, आमदार श्री.सुनिल प्रभु, आमदार श्री.सुनिल शिंदे, आमदार श्री.राहूल पाटील, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख श्री.संजय पडते, युवासेना कार्यकारिणी सदस्य श्री.अंकित प्रभु, श्री.समाधान सरवणकर, श्री.हेमंत दुधवडकर यांच्यासह अनेक शिवसेना तसेच युवासेना नेते मंडळी व कार्यकर्त्यांसोबत प्रचार करत असुन निवडणूक प्रचार संदर्भात सर्व नेत्यांचे मार्गदर्शन घेत आहेत.

         

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स