अखेर नितेश राणेंना जामीन...!
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी म्हणून न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप आम. नितेश राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी नितेश राणे यांच्यासह राकेश परब याला वैयक्तिक प्रत्येकी 30 हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. ४ फेब्रुवारी रोजी आम.नितेश राणे यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावरील सुनावणी ८ रोजी पूर्ण झाली होती. आज न्यायालयाने निर्णय देत जमीन मंजूर केला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)