उपसरपंचपदी शैलेंद्र शंकरदास बिनविरोध..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील वरची गुरामवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शैलेंद्र अनंत शंकरदास यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल शंकरदास यांचे सरपंच सौ. स्वाती वाइरकर यांच्यासह अन्य सदस्य आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश पेणकर, मकरंद सावंत, मयुरी कुबल, रूपाली परुळेकर, प्राची म्हाडगुत, ग्रामसेवक प्रकाश सरमळकर, सुनील नाईक, आबा कामतेकर, प्रकाश भोसले, सतीश वायकर सुनील गुराम, दादा मिठबांवकर आदी काराणेवाडी, कुंभारवाडी, तेलीवाडी, ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)