ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
त्रिवार दिक्षा....!

त्रिवार दिक्षा....!

प्रकाशन: 08 Feb 2022 11:54 PM
वाचन संख्या 163

सिंधुदुर्गची कन्या दिक्षा नाईकला सलग तिसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मुकुट..!


चौके | अमोल गोसावी : यंदा संपन्न झालेल्या मराठवाडा आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टीवलमध्ये सिंधुदुर्गातील स्नेहांश एन्टरटेन्मेंट निर्मित आणि श्री. शेखर गवस दिग्दर्शित ‘झुलबी 2’ लघुपटातील बायग्याची भूमिका करणारी कुमारी दिक्षा प्रमोद नाईक हिने सलग तिसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळविला.
याआधी दिक्षाला झुलबी शॉर्टफिल्मसाठी संकल्प शॉर्टफिल्म व मुंबई एन्टरटेन्मेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला आहे. तिच्या या यशामध्ये श्री. शेखर गवस, श्री. रवि कुडाळकर, श्री. शेखर सातोस्कर तिचे आईवडील आणि संपूर्ण स्नेहांश एन्टरटेन्मेंट टीमचे मोलाचे योगदान आहे.
दिक्षा ही कुडाळ इंग्लिश मिडीयम स्कूल ची विद्यार्थिनी असून ती मूळची गोळवण तालुका मालवण येथील असून सध्या कुडाळ पिंगुळी येथे राहते. तिच्या या यशाबद्दल तिची सर्व स्तरांतून भरपूर प्रशंसा होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स