बांदा देऊळवाडी येथील भरडावर अग्नितांडव..!
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा शहरात देऊळवाडी भरडाला काल दुपारी भीषण आग लागल्याने सुमारे ५ एकर क्षेत्रातील काजू बागायती जळून खाक झाली.
बांदा शहरात देऊळवाडी भरडाला काल दुपारी भीषण आग लागल्यानेल काजू बागायती जळून खाक झाली.
यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. काजू हंगामाच्या तोंडावरच बागायती जळल्याने संबंधीत शेतकरी व बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.
काल दुपारी अचानक आग लागण्याची घटना घडली. याठिकाणी नजीक वस्ती नसल्याने सुरुवातीला आग लागल्याचे लक्षात आले नाही. दुपार असल्याने व वाऱ्याचा वेग असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. यामध्ये तुकाराम मोरजकर, राजन मोरजकर, राजा सावंत, यांची काजू बागायती जळून खाक झाली. तसेच सागवान, जांभुळाची झाडे देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. स्थानिकांनी पाणी व मातीच्या साहाय्याने सायंकाळी उशिरा आग विझवली. वेळीच आग विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)