ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
हडी गांवचे सरपंच महेश मांजरेकरांचा प्रकाश आवाडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव...!

हडी गांवचे सरपंच महेश मांजरेकरांचा प्रकाश आवाडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव...!

प्रकाशन: 07 Feb 2022 12:49 PM
वाचन संख्या 389

चिंदर | विवेक परब : महाराष्ट्र चेंबर आँफ काॅमर्स  अँड इंडस्ट्री अँग्रिकल्चरच्या कौन्सिल मेंबर पदाचा पदग्रहण सोहळा मुंबईत संपन्न झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्घाटक व मुख्य मार्गदर्शक म्हणून तर केंद्रीय , अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्याचे माजी वस्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे,चेंबरचे अध्यक्ष ललीत गांधी, माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर अशा विविध,ठिकाणाहून आलेल्या  पदाधि-यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  मालवण तालुक्याच्या हडी गांवचे सरपंच महेश मांजरेकर यांचा सन्मान करण्यात आला. मांजरेकर हे सद्गुरु सदानंद माऊली एज्युकेशन फाऊंडेशन संचालीत डाॅ. एस. एस. कुडाळकर हायस्कुलचे संचालक आहेत. मांजरेकर हे विविध क्षेत्रात धडाडीने कार्यरत असून विविध संस्थान मध्ये सक्रीय आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण विकास प्रक्रियेत  उपक्रमशील सरपंच म्हणून ते बहुचर्चित आहेत. मांजरेकर व क्रियाशील सदस्यांच्या कामाची केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, व भागवत कराड यांच्या कडून प्रशंसा करण्यात आली. मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व भागवत कराड यांनी मार्गदर्शन केले तर प्रकाश आवाडे ,ललीत गांधी यांची भाषणे झाली.
हडी सरपंचांच्या गौरवाची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स