ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात जे जे ऍक्ट नुसार गुन्हा झाला दाखल..!

विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात जे जे ऍक्ट नुसार गुन्हा झाला दाखल..!

प्रकाशन: 05 Feb 2022 11:14 AM
वाचन संख्या 208

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नजिकच्या एका खाजगी इंग्लिश मिडियम स्कूलमधील पाचवितील विद्यार्थ्याला मारहाण केल्याबद्दल पालकांच्या फिर्यादीनुसार शिक्षक एकनाथ धनवटे यांच्या विरोधात ‘जे जे ऍक्ट’ नुसार कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कणकवली पोलीस ठाण्यात पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 2 फेब्रुवारी रोजी वाढलेले केस कापले नाहीत या कारणावरून पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला एकनाथ धनवटे या शिक्षकाने शाळेच्या ग्राउंडवर केसाला धरून जमिनीवर आपटले. आणि हाताच्या थापटाने कानाखाली मारले. याबाबत वडिलांना सांगितल्यास आणखी मारण्याची धमकी दिली असे म्हटले होते.त्यानुसार शिक्षक धनवटे विरोधात सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत मारहाण झालेल्या मुलाच्या पालकांनी चाईल्ड लाईन हेल्पलाईन नं 1098 वर तक्रार दिली होती.त्यावरून चाईल्ड लाईन च्या पदाधिकाऱ्यांनीही याबाबत मारहाण झालेल्या विद्यार्थ्याची व पालकांची भेट घेत माहिती घेतली होती.तसेच त्याच्या शाळेत जाऊनही चौकशी केली होती.दरम्यान याबाबत सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिक चौकशीअंती जे जे ऍक्ट अर्थात बाल न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम http://localhost/news/public/uploads/2015 चे कलम 75, 82 नुसार मारहाण करणारा शिक्षक एकनाथ धनवटे विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री पाटील करत आहेत. विद्यार्थ्याला शिस्तीच्या नावाखाली अमानुष दंड वागणुक देणे हे सदर शिक्षकाला चांगलेच भोवले जाणार अशीच शक्यता वर्तवली जात आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स