ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
आचरा श्री रामेश्वर सोसायटी निवडणुकीचा संग्राम सुरु..!

आचरा श्री रामेश्वर सोसायटी निवडणुकीचा संग्राम सुरु..!

प्रकाशन: 05 Feb 2022 09:41 AM
वाचन संख्या 192

भाजप पुरस्कृत श्री देव रामेश्वर सहकारी विकास पॅनेलकडून १८ उमेदवारी अर्ज दाखल.

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी संस्था, पतसंस्था यांच्या निवडणुकी पार पडत असताना राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आचरा येथील श्री देव रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित सोसायटीच्या निवडणुकीसाठी भाजप पुरस्कृत श्री देव रामेश्वर सहकारी विकास पँनलकडून आज १८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
अर्ज दाखलकरणा-यांन मध्ये सर्व साधारण प्रतिनिधी म्हणून-अवधूत हळदणकर, सदानंद घाडी, समिर बांवकर, सुहास परब, लवू मालंडकर, अनिल करंजे, भिकाजी कदम, प्रशांत पांगे, संतोष मिराशी, प्रफुल्ल घाडी, प्रिया आचरेकर, गौरव वाडेकर तर महिला प्रतिनिधी म्हणून निशा गांवकर, मनाली तोंडवळकर, प्रिया आचरेकर यांनी इतर मागासमधून धनजंय टेमकर, अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी लक्ष्मणराव आचरेकर तर भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी म्हणून डाॅ. प्रमोद कोळबंकर यांनी अर्ज दाखल केले. या निवडणुकीसाठी भाजपकडून पक्ष निरिक्षक म्हणून संतोष गांवकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
निवडणूक अर्ज दाखल करतानां भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणिस महेश मांजरेकर, संतोष कोदे, जेराॅन फर्नांडिस, राजन गांवकर, चिंदर विकास सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, बाबू कदम, लवू घाडी, विश्वास गांवकर, सचिन हडकर हे उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स