सिंधुविहान...! (कवितेचा मंच.) भाग : ३ रा.
शब्द..! (कवयित्री सौ.अनुराधा दीक्षित ,वाडा ,देवगड,जि.सिंधुदुर्ग .)
शब्द..!
शब्द बनतात, शब्द सजतात..
शब्द खुलतात, शब्द फुलतात..
शब्द कळतात, शब्द वळतात..
शब्द सुखावतात, शब्द दुखावतात
शब्द रुसतात, शब्द फसतात
शब्द टोचतात , शब्द बोचतात
शब्द रडवतात, शब्द हसवतात…
शब्दांना मान असतो, शब्दांना सन्मान असतो..
शब्द देतात आचार, शब्द देतात विचार..
शब्द आहेत अनमोल, शब्द मनातले बोल..
शब्दांना असते धार,शब्दांनीच येते बहार…
शब्दांवर ध्यान द्यावे, शब्दांना भान द्यावे..
शब्दांना ओळख द्यावी,..शब्दांशी मैत्री व्हावी…
अफाट आहे शब्दभांडार, बेफाट आहे शब्द संसार..
शब्दच नसते जगात, जगणंच असतं मौनात..!
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)