नितेश राणे सुपारीबाज आमदार म्हणून ओळखले जाणार..!
माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची घणाघाती टीका..!
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या श्री संतोष परब यांच्या हल्ल्यात संशयीत म्हणून आमदार नितेश राणेंना चौकशीसाठी 2 दिवस पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आमदार नितेश राणे हे आता सुपारीबाज आमदार म्हणून राज्यात ओळखले जातील अशा शब्दांत माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी नितेश राणेंवर घणाघात केला आहे.संतोष परब हल्ल्याचा आणि पोलीस तपासाचा घटनाक्रम सतीश सावंत यांनी उलगडून सांगितला.28 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2021 रोजी संतोष परब याचा फोटो नितेश राणेंच्या व्हाट्सएपवरून संतोष परबवर मारेकरी पाठवणाऱ्या सचिन सातपुतेला पाठवला गेला. संतोष परब वर हल्ला करण्यासाठी नितेश राणेंनी सचिन सातपुते याला सांगितले होते. दिल्लीमधून सातपुतेला अटक केल्यानंतर सातपुतेकडून पोलीस तपासात नितेश राणेंचे नाव उघड झाले. त्यामुळे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याना मारण्यासाठी सुपारी देऊन खुनी हल्ला करायला लावणारे नितेश राणे आता राज्यात सुपारीबाज आमदार म्हणून ओळखले जातील अशा खरमरीत शब्दांत सतीश सावंत यांनी आमदार नितेश राणेंवर घणाघात केला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)