ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवली नाभिक संघटनेच्या आंगणेवाडीत पायी वारीचे यंदा आठवे वर्ष...!

कणकवली नाभिक संघटनेच्या आंगणेवाडीत पायी वारीचे यंदा आठवे वर्ष...!

प्रकाशन: 01 Feb 2022 02:07 AM
वाचन संख्या 82

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : नाभिक समाजाला संत परंपरा आहे. नाभिक समाजाचे दैवत संत सेना महाराज यांच्या प्रेरणेमुळे ही अध्यात्मिक परंपरा, वारसा हे बांधव पुढे नेण्याचे काम करत आहेत. देव दर्शन व आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीकोनातून या पायी वारीचे आयोजन गेली आठ वर्षे कणकवली संघटनेतर्फे केले जाते. हे अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन राज्यसंघटक विजय सि. चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे केले.
परमेश्वरामुळे आपण आहोत ही जाणिव ठेऊन, मानव त्याच्या दर्शनासाठी अहोरात्र मेहनत करत असतो. आणि ईश्वरी सेवेसाठी मनाची पुर्ण तयारी दाखवतो. मानवाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या तर तो परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन त्याच्या नामस्मरणाला लागतो. सिंधुदुर्गातले नाभिक बंधु परमेश्वराच्या कृपाशीर्वादाने आपले जीवन चरितार्थ चालवत आहेत आणि याची जाणीव ठेवून दरवर्षी कणकवली ते आंगणेवाडी भराडी देवीच्या दर्शनासाठी पायी वारी करून दर्शन घेतात. पायी दिंडीत, आई भराडी देवी की जय, संत सेना महाराज की जय अशा घोषणा देत भराडी देवीचं दर्शन घेतात.
यावेळी जिल्हा अध्यक्ष अनिल अणावकर, सचिव प्रविण कुबल, आनंद आचरेकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. प्रतिभा चव्हाण, मालवण अध्यक्षा सौ. दिपा शिंदे, कणकवली
अध्यक्षा सौ. तेजस्विनी तुळशीदास, कार्याध्यक्षा सौ. प्रिया चव्हाण, उपाध्यक्षा सौ. भक्ती विलास चव्हाण, यांनी मार्गदर्शन केले.पायी वारी करणारे सेवक नामदेव , अभिजित आचरेकर यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच आंगणेवाडीत सर्व नाभिकांची सेवा करणारे उद्योजक बंडु चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी, जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण, दशरथ चव्हाण, अॅड. भाऊ चव्हाण, मसुरे विभाग प्रमुख जगदिश चव्हाण, पतसंस्थेचे उपाध्यक्ष व जेष्ठ बांधव शंकर चव्हाण, डांगमोडे येथील उद्योजक मंगेश चव्हाण, निलेश चव्हाण, महेश चव्हाण, लक्ष्मीकांत चव्हाण, पराग चव्हाण, निलेश महेश चव्हाण, देवेंद्र चव्हाण, यश चव्हाण, अजय चव्हाण, वेरली उपसरपंच श्याम चव्हाण, तसेच कणकवली व मालवण तालुक्यातील बंधू-भगिनी आंगणेवाडीच्या भराडी आईच्या दर्शनाला उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स