ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जेष्ठ व्यापाऱ्यांच्या सचोटीचा व प्रामाणिकपणाचा आदर्श युवा व्यापाऱ्यांसाठी प्रेरणादायी : अर्जुन बापर्डेकर.

जेष्ठ व्यापाऱ्यांच्या सचोटीचा व प्रामाणिकपणाचा आदर्श युवा व्यापाऱ्यांसाठी प्रेरणादायी : अर्जुन बापर्डेकर.

प्रकाशन: 01 Feb 2022 01:45 AM
वाचन संख्या 57

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा बाजारपेठेतील जेष्ठ व्यापाऱ्यांचा प्रामाणिक आणि सचोटीच्या व्यवहार आचरा बाजारपेठेच्या उत्कर्षासाठी महत्वपूर्ण असून सध्याच्या युवा व्यापाऱ्यांसाठी तो प्रेरणादायी असल्याचे मत आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर यांनी कणकवली येथे व्यक्त केले.
जिल्हा व्यापारी महासंघाच्या एकता मेळाव्यात पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर,सचिव नितीन वाळके, कोषाध्यक्ष अरविंद नैवाळकर,कणकवली तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष दिपक बेलवलकर, आचरा व्यापारी संघटनेचे जयप्रकाश परुळेकर, मंदार सांबारी, माणिक राणे,पंकज आचरेकर, मंगेश टेमकर, अनिल करंजे,हेमंत गोवेकर, परेश सावंत, चंदू कदम, यांसह महासंघाचे अन्य पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा व्यापारी महासंघातर्फे देण्यात येणारा या वर्षीचा कै.प्रतापराव केनवडेकर आदर्श व्यापारी संघटना पुरस्कार आचरा व्यापारी संघटनेला जिल्हा व्यापारी महासंघाच्या ३४व्या व्यापारी एकता मेळाव्यात प्रदान करण्यात आला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स