एस फाउंडेशनच्या राज्यस्तरीय गायन स्पर्धेत आचल आरोसकर अव्वल..!
बांदा | राकेश परब : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘एस फाउंडेशनतर्फे’ आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलची आठवीतील विद्यार्थिनी कु. आचल अजय आरोसकर हिने मोठ्या गटात प्रथम क्रमांक मिळविला.
विविध गटात ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील देशप्रेम जागृत व्हावे या उद्देशाने ही स्पर्धा राज्यस्तरावर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. आचल हिला प्रशालेच्या शिक्षिका शुभा गावडे, वडील अजय आरोसकर, आई अश्विता आरोसकर यांचे मार्गदर्शन लाभले. आचल हिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)