ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
व्यापारी एकता मेळाव्यास पाठिंबा पण व्यवसाय बंद ठेऊन सहभागी व्हायला विरोध :श्री विष्णू मोंडकर

व्यापारी एकता मेळाव्यास पाठिंबा पण व्यवसाय बंद ठेऊन सहभागी व्हायला विरोध :श्री विष्णू मोंडकर

प्रकाशन: 29 Jan 2022 11:12 PM
वाचन संख्या 71

चिंदर |विवेक परब : “पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आयोजित दिनांक ३१/०१/२०२२ रोजी होणाऱ्या व्यापारी एकता मेळाव्यास आमचा पाठींबा आहे.व्यापारी वर्गाच्या न्याय हक्कासाठी ही संघटना चांगले कार्य करत आहे. पर्यटन महासंघ स्थानिक व्यावसायिकांच्या न्याय हक्कासाठी काम करणाऱ्या सर्व संघटनांच्या सोबत आहे .परंतु व्यापारी महासंघाच्या ‘व्यवसाय बंद ठेऊन सहभाग’ या आवाहनाला पर्यटन व्यावसायिक महासंघाचा विरोध आहे. दोन वर्षात कोरोना महामारीमुळे उध्वस्त झालेल्या व्यावसायिकाला व्यवसाय बंद ठेवणे हे आवाहन चुकीचे वाटते तसेच सदर मेळावा हा व्हर्च्युअल (ऑनलाईन) पद्धतीने असल्याने आपण व्यवसाय चालू ठेवूनही मेळाव्यात सहभागी होऊ शकता.पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या विचारधारेशी जोडलेल्या सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवसाय चालू ठेऊन ऑनलाईन व्यापारी मेळाव्यात आपला सहभाग दर्शवावा”,असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री.विष्णू मोंडकर यांनी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स