ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आरटीपीसीआर चाचणीला केला शिक्षक भारतीने तीव्र विरोध..!

आरटीपीसीआर चाचणीला केला शिक्षक भारतीने तीव्र विरोध..!

प्रकाशन: 28 Jan 2022 11:50 PM
वाचन संख्या 64

अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सोमवारपासून विद्यार्थ्यांची शाळा सुरू करावी असे पत्रक माध्यमिक शिक्षणाधिकारी या काढले असून इ.१ली ते इ.१२ वी ला कार्यरत असणा-या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शनिवार दि.२९ रोजी स.९ ते दु.२ या वेळेत सरसकट आरटीपीसीआर चाचणी करावी असा आदेश देण्यात आला होता. आदेशाला शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटनेने कडाडून विरोध करीत हा अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करण्याची लेखी मागणी जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी व माध्यमिक, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शिक्षक भारती ने केली आहे.
प्रशासनाच्या निर्णयाला सर्व शिक्षक सामुहिक बहिष्कार घालणार असल्याची माहिती शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर, प्राथमिक शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली आहे.
मागील आठवड्यात इतर काही जिल्ह्यामध्ये शाळा सुरू झाल्या आहेत पण, अशा प्रकारे तिथे कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही मग, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांनाच RTPCR चाचणीसाठी का वेठीस धरले जाते? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
कोरोनाचा प्रसार फक्त शिक्षकांमुळेच होतो असा गैरसमज प्रशासनाचा झाला आहे, मुळात शिक्षकांचे लसीकरणाचे दोन्ही डोस झाले आहेत,तसेच मुलांची शाळा बंद होती पण.. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नियमितपणे शाळेत हजर होते,कर्मचाऱ्यांची शाळा बंद नव्हती आणि त्यांनी मुख्यालयही सोडलेलं नाही. नियमितपणे शाळेत हजर राहून ऑनलाइन वर्ग घेतले आहेत.जर शिक्षकांची शाळाच बंद नव्हती मग, त्यांना आरटीपीसीआर करण्याची सक्ती का करता? असा सवाल त्यांनी केला असून सर्वाची शनिवारी होणारी कोरोनाची चाचणी प्रशासनाने त्वरित रद्द करावी अशी मागणीही संजय वेतुरेकर व संतोष पाताडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स