ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत तळगांव,वायरी व कुंभारमाठ येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन.

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत तळगांव,वायरी व कुंभारमाठ येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन.

प्रकाशन: 28 Jan 2022 11:42 PM
वाचन संख्या 67

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळगांव, वायरी, कुंभारमाठ येथील विविध विकास कामांची भूमिपूजने आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये  तळगांव देवारेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, तळगाव व्यायाम शाळा पायाभरणी, तळगाव खांदवाडी संरक्षण  भिंत बांधणे, तळगांव देऊळवाडी नाल्यावर साकव बांधणे, तळगाव शेळवणेवाडी बोभाटे घर  येथे साकव बांधणे,त्याचबरोबर वायरी भूतनाथ स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, मालवण मुख्य रस्ता ते सर्वोदय कॉलनी जाणारा रस्ता अशा विविध कामांचे भूमीपूजन संपन्न झाले. 
यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, तळगांव येथे सरपंच अनघा वेंगुर्लेकर, उपसरपंच अनंत चव्हाण,माजी उपसपंच  प्रसाद दळवी,माजी सरपंच आपा देसाई, शाखा प्रमुख संतोष पेडणेकर, शिशुपाल राणे, जयवंत बोभाटे,जयेश बोभाटे,सुरेश दळवी आणि कुंभारमाठ येथे आनंद सावळे, पी. जी. पाटील, कमलाकर पाताडे, महेंद्र पाताडे, सुरेंद्र परब, आनंद पाटकर, अनिल मोर्जे, भालचंद्र पाटील, पूनम सावळे, यशवंत कोयंडे, जमशेठ  खान तर वायरी येथे प्रसाद आडवणकर, भगवान लुडबे, मनोज लुडबे, संदेश तळगावकर, शामा झाड, मिलिंद झाड, गोट्या मसुरकर, बाबल गोसावी, नाना नाईक, दीपा देसाई, कृष्णा देऊलकर, प्रदीप वेंगुर्लेकर, अभय पाटकर आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स