ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
जिल्ह्यातील शाळा लवकरच पुनश्च नियमीत सुरु होणार..!

जिल्ह्यातील शाळा लवकरच पुनश्च नियमीत सुरु होणार..!

प्रकाशन: 28 Jan 2022 11:27 PM
वाचन संख्या 77

तारखेची झाली घोषणा..!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील १ ली ते १२ वीचे वर्ग ३१ जानेवारी २०२२पासून पुन्हा एकदा चालू करण्याचे आदेश शिक्षण अधिकारी डॉ. मुश्ताक शेख यांनी दिले आहेत. सुरक्षिततेची पुर्ण काळजी घेऊन तसेच कोविडचे नियम पाळून शाळा सुरू करण्यात याव्यात. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियमित शाळेच्या वेळेत पूर्ण वेळ उपस्थित राहून कामकाज करावे असे या आदेशात स्पष्ट केले आहे. राज्यात ओमिक्रोनच्या रूपात कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर ६ जानेवारी २०२२ पासून जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश यापूर्वी शिक्षण विभाग कडून देण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागल्याने विविध संघटना तसेच माध्यमातून शाळा चालू करण्याबाबत मागणी झाल्या नंतर राज्य शासनाने २४ जानेवारीपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा शाळा सुरु करण्यास परवानगी दिली होती. ही परवानगी देताना स्थानिक पातळीवरती कोरोना ची परिस्थिती लक्षात घेता निर्णय घ्यावेत असे स्पष्ट केले होते. दरम्यान शुक्रवारी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी डॉक्टर मुस्ताक शेख यांनी याबाबत आदेश काढले असून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा मधील १ ली ते १२ वीचे वर्ग दिनांक ३१ जानेवारीपासून चालू करण्याचे आदेश देण्यात आले असल्याने पुन्हा एकदा शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकू येणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स