आमदार डॉ. राजन साळवी यांच्याहस्ते अंगणवाडीच्या नूतन इमारतीचे उदघाटन..!
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : लांजा तालुक्यातील गवाणे जिल्हा परिषद गटातील मठ कडूगांव येथे डोंगरी विकास योजना सन २०२१-२२ अंतर्गत ८ लाख ५० रुपये व मठ गांगरकर गांव येथे डोंगरी विकास योजना सन २०२१-२२ अंतर्गत ८ लाख ५० रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या अंगणवाडीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी ह्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, सभापती मानसी आंबेकर, उप तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, विभागप्रमुख लक्ष्मण मोर्ये, उप विभागप्रमुख सिद्धेश पांचाळ, सरपंच वैष्णवी साळवी, उप सरपंच केशव बंडबे, शाखाप्रमुख संदेश कडू, संदीप गांगरकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पवार, महिला विभाग संघटक पायल साळवी, राजेश बंडबे, ठेकेदार अमित बंडबे, मयुरी कांबळे, संध्या कडू, जयराम गांगरकर, बालविकास अधिकारी राजेश गजलवाड, अंगणवाडी सेविका सायली शिंदे, मदतनीस रोशनी गांगरकर, आशा सेविका स्वप्ना गांगरकर, गांवकर दिपक गांगरकर, मानकरी दीपक विश्राम गांगरकर, आरोग्य सहायक वाघटे, पवार व मान्यवर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)