ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ग्लोबल रक्तदाते मालवण परिवाराकडून ओरोस रक्तपेढिला भेटवस्तू सुपूर्द!

ग्लोबल रक्तदाते मालवण परिवाराकडून ओरोस रक्तपेढिला भेटवस्तू सुपूर्द!

प्रकाशन: 22 Jan 2022 07:33 PM
वाचन संख्या 71

ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र ४थ्या वर्धापनदिनाचे औचित्य

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र ४थ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालय रक्तपेढीला पाच वजन काटे व ब्लड डोनर कोच चे पूर्ण काम करून त्यावर रेक्झिन मारून देण्यात आले.
काही दिवसांपूर्वी ओरोस जिल्हा रुग्णालयात रक्तपेढीमध्ये ब्लड डोनेशनच्या वेळी आवश्यक असणाऱ्या वजनकाट्यांची कमतरता होती व ब्लड डोनेशन बेड हे पूर्णतः खराब असल्याचे रुग्णसेवक श्री.राजेश पारधी यांनी श्री अमेय देसाई यांना याची कल्पना देऊन या साठी मदतकार्य करण्याचे सुचवले होते. त्यानुसार ग्लोबल रक्तदाते समूह संघटक परिवारातर्फे अति आवश्यक पाच वजन काटे व ब्लड डोनर कोच चे पूर्ण काम करून त्यावर रेक्झिन मारून सर्व सुस्थितीत करून सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील,व आरोग्य सेवक श्री किशोर नांदगावकर याच्या जवळ ही मदत सुपूर्द करण्यात आली. ब्लड डोनेशन कोचचे रेक्झिनचे काम कट्टा येथील श्री. नितीन चव्हाण व त्यांचे मित्र यांनी ओरोस ब्लडबँक मध्ये येऊन पूर्ण केले.


या वेळी ग्लोबल रक्तदाते परिवाराचे वर्धापन दिनाच्या रक्तपेढी तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या व दिलेल्या भेटवस्तू बदल आभार मान्यात आले.
या वेळी उपस्थित ग्लोबल रक्तदाते समिती संघाटक श्री.राजा शंकरदास,श्री.अमेय देसाई, श्री. राजेश पारधी ,श्री. विकास पांचाळ,श्री.दिपक ढोलम,राकेश दर्गे,आदी उपस्थित होते.
या सर्व कार्यासाठी ग्लोबल रक्तदाते मालवण समिती संघटक राजा शंकरदास ,राजेंद्र बिडये, अमेय देसाई, विकास पांचाळ,राकेश डगरे, दीपक ढोलम, सौ.नेहा कोळंबकर,सौ. राधा केरकर, या सर्वांनी आर्थिक सहकार्य केले .
ब्लड बँक ओरोस च्या माध्यमातून आज पर्यंत खूप मोलाचे सहकार्य आजपर्यंत मिळत आलेले आहे त्याच जाणिवेतून आपण त्यांचे काहीतरी देणे लागतो आणि
आपण जे काही रक्तदानाचे कार्य करतो त्यासाठी ब्लड बँक ही सुस्थितीत असणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन ही मदत करण्यात आली .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स