पट्टेरी वाघाच्या दहशतीने स्थानिकांना करून सोडले सळो की पळो…
घबराटीमुळे गावात चालू आहे दिवसरात्र पहारा.
चिपळूण | वार्ताहर :- चिपळूण तालुक्यातील कोंढर ताम्हणे गावातील आंग्रेवाडी येथील परिसरात मागील काही ३ दिवस सतत संध्याकाळी आणि रात्रीच्या सुमारास वाघाचे दर्शन ग्रामस्थांना होत असल्याने गावात चिंतेचे वातावरण आहे. या गोष्टीची गंभीर दखल तात्काळ वनविभाग खात्याच्या कानावर घालण्यात आली.
कोंकण पट्टयात सहसा पट्टेरी वाघ म्हणजे दुर्मिळच. पण प्रत्यक्ष स्थानिक लोकांनी पट्टेरी वाघ पाहिल्यामुळे त्याची दखल वनविभागाने घेत पुढील २ रात्र, २ दिवस जिल्हा वन अधिकारी यांनी ग्रामस्थांच्या साहाय्याने भीतीचे सावट दूर करण्यासाठी पहारा देत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)